
शेती म्हणजे काय वो..!!
जगण्याचा पाया म्हणजे शेती म्हणलं तर काही वागव ठरणार नाही, भूक लागली की पावलं आपोआप घरातील टोपल्याकडे जातात अन् त्यातील भाकरी खाऊन जे मन तृप्त होतं ना त्यालाच शेती म्हणतात. सृष्टी ला बनवणाऱ्याने कायम शेतीलाच महत्त्व दिलय माणसाचं संपूर्ण आयुष्य शेतीभवतीच ठेवलंय माणसाला जगायला लागणारी प्रत्येक गोष्ट शेतीपासूनच अन् शेतीलाच जोडलेली आहे पण माणसाला याचा विसर पडायला लागलाय अन् हाच विसर माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारा आहे. विकासाच्या नावाखाली माणसाने कधीच कोणत्या गोष्टीचा समतोल राखला नाहीये कायम पर्यावरण, जैवविधता आणि शेतीला दुर्लक्षित ठेवलंय. विकासाच्या नावाखाली जगायला लागणारा ऑक्सिजन झाडचं देतात हे पण विसरून गेलाय माणूस. मग शेतीला ला तर काय समजणार. तुमचं विज्ञान, टेक्नोलॉजी कितीही विकसित झाली तरी प्लास्टिक पासून गहू बनवून तुम्हाला खायला नाही घालणार त्या साठी तुम्हाला कायम शेतीवरचं अवलंबून रहावं लागणार आहे हे कायम लक्षात ठेवा. मी म्हणतच नाही विकास व्हायला नाही पाहिजे पण त्या विकासाला समतोलच नसेल तर काय फायदा? आम्ही शेतकरी म्हणून शेती कायम टिकवतच राहणार पण शेती म्हणलं की कायम नाक मुरडनच चालू राहील तर आमचा पण नाईलाज होणार हे नक्कीच. शेतीला टिकवायचं असेल, जगण्याचा पाया ढासळू द्यायचा नसेल तर शेती अन् शेतकऱ्यांना समजून घ्यावाचं लागेल. शेती हा माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे जगण्याच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे, म्हणून म्हणतोय दृष्ठिकोन बदला शेती अन् शेकऱ्यांना समजून घ्या. शेतकरी तुम्हाला कधीच उपाशी झोपू देणार नाही.!!🙏❤️☘️
✍🏻रविराज साबळे-पाटील